सोन्यात अशी गुंतवणूक केल्यास नुकसान होत नाही.Soverian Gold Bond in Marathi

सोन्याच्या दुकानांमधून एक लाख रुपये किमतीचा दागिना बनवून जेव्हा मी दुकानाच्या बाहेर आलो आणि बसल्या बसल्या एक गणित केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की दुकानाचा उंबरा मी जेव्हा ओलांडला पाच मिनिटाच्या आत ह्या सोन्याची किंमत 82 हजार रुपये झालेली होती.

म्हणून मी ठरवलं की दागिने घ्यायचेच नाही मग काय घ्यायचं तर सोन्याचे कॉइन किंवा सोन्याचे बिस्किट घेण्याचा विचार मी करू  लागलो.

 ज्याला मेकिंग चार्जेस लागत नाही पण मग एक सरकारने एक नवीन पर्याय काढलाय  ज्यामध्ये तर तुम्हाला तुमचं सोन सांभाळायची गरज नाहीये आणि भाव वाढव किंवा कमी हो तुम्हाला दरवर्षाला अडीच टक्के तुमच्या सोन्याच्या किमतीच्या व्याज मिळणार आहे आणि जेव्हा त्याची विक्री करायची असेल त्यावेळेस त्याचा किंमत वाढलेला असेल तर तो देखील फरक तुम्हाला मिळणार आहे. 

सोन्यात गुंतवणूक कशी करावी

गुंतवणुकीच्या बाबतीत सर्वात सुरक्षित मानली गेली सोन्या मधली गुंतवणूक.भरपूर लोक ज्यांना  फारशी माहिती नाहीये ते लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. कोणत्या सोन्यामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे काही लोकांचा असे मत असतं की सोन्याचं काही जरी बनवलं सोन्यात कशी जरी गुंतवणूक केली तरी त्यामध्ये वाढत होत असते.

सोन्यात गुंतवणूक केली म्हणजे असं नाही की तुमचे पैसे वाढतीलच काही सोने असे देखील आहेत की ज्यामुळे तुम्ही गुंतवणूक करता जे खरेदी करून घरी आणतात ती वाढत नाही त्याची घट होते.ती गुंतवणूक 30% 40% 50% ने घटू शकते आणि तुमचं नुकसान होऊ शकतं.

फक्त सोनू म्हणून काहीही खरेदी करायचं नाहीये.सोन्यामध्ये नेमकं काय खरेदी करायचा आहे जे तुमच्या वेळेला कामाला येईल जे तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देखील देईल त्याच्यावर  गरज पडल्यास कर्ज निघू शकेल. त्याची किंमत कधीही कमी नाही झाली पाहिजे तर या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच सोन्यामध्ये गुंतवणुकीचा योग्य पर्याय आपल्याला निवडावा लागतो.

आता बऱ्याच वेळा होतं काय की लोक सोन्याचे दागिने खरेदी करतात सोन्याची चेन खरेदी करतात सोन्याचे अंगुठी बनवतात किंवा कानातली बाळी बनवतात तर जी सोन्याच्या गोष्टीची गरज आहे ती ते सोन्याची बनवून घेतात अगदी पाच लाख दहा लाख पंधरा लाखापर्यंत सोन्याचे दागिन्यांची खरेदी करतात. त्यांचा उद्देश एकच असतो की जर कधी गरज पडली तर याचे चांगले पैसे होतील.पण हे जे तुम्ही सोन्याची दागिने बनवून जे ठेवतात ज्यामध्ये तुमचा नफा नाही तर तोटाच होत असतो.मी सोन्यावर कर्ज घेण्याची गोष्ट करत नाही कारण की कर्ज घेताना एवढं काय तुमच्या लक्षात येणार नाही भरपूर बँक किंवा फायनान्स कंपन्या तुमचा जेवढे वजन आहे तर त्याच्या किमतीच्या 75 ते 90% पर्यंत तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देतात पण तुम्ही जेव्हा विकायला जाते तेव्हा तुम्हाला समजतं की त्यात किती नुकसान होतात सोन्यात अशी गुंतवणूक करायला पाहिजे की ज्याच्यात कधीच नुकसान होणार नाही.

आता जे दागिने तुम्ही बनवता अंगठी काही गळ्यातील लॉकेट्स असतील किंवा हातातली ब्रेसलेट किंवा कानातील जे काय दागिने असतील आता हे ज्या वेळेस तुम्ही बनवता कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की सोन्याचा भाव हा नेहमी वाढतच राहणार आहे ज्यावेळेस आपण विकायला जाऊ त्यावेळेस तर नक्कीच भाव जास्त असेल पण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ज्या दुकानातून हे दागिने खरेदी केले पुन्हा तेच दागिने तुम्ही वर्षभराने विकायला घेऊन जा भले का त्यावेळेस पेक्षा पाच दहा हजार रुपये भाव का वाढलेला असू द्या तरी देखील तुमचं 30 ते 40% नुकसान होऊ शकतात कसं काय ते आता पाहूयात.

सोन्यात गुंतवणुकीच उदाहरण

आता होतं काय उदाहरणार्थ एक लाख रुपयाची दागिन्याची खरेदी करून तुम्ही गेले आता यामध्ये मजुरी म्हणजेच मेकिंग चार्जेस हे जवळपास दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत असू शकतात.

म्हणजे एक लाख रुपयाचे उदाहरणार्थ एखादा दागिने बनवला कधी चेन किंवा अंगठी किंवा काही पणएक लाख रुपये बनवायला तुम्ही घेऊन गेले पण पंधरा टक्के मेकिंग शर्ट म्हणजे 15000 रुपये मेकिंग चार्जेस आहे म्हणजे तो व्यक्ती तुम्हाला एक लाख रुपयांमध्ये फक्त 85 हजार रुपये सोन देणार आहे  पैसे तर पूर्ण एक लाख रुपये घेणार.

आता जेव्हा तुम्ही ते विकायला जातात त्यावेळेस पंधरा हजार रुपये तर आधीच आपले मजुरीचे कट होणार आहे आणि विक्री करत असताना तीन टक्के जीएसटी हा कट केला जातो म्हणजे ते सोन होणार 82 हजार रुपयांचा .

म्हणजेच सोन्याच्या दुकानातून ज्यावेळेस तुम्ही बाहेर येता त्याच वेळेस ते सोनं 82 हजार रुपयांचा झालेला असेल

म्हणजेच सोन्याच्या दुकानातून ज्यावेळेस तुम्ही बाहेर निघाल त्यावेळेस एक लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्याची किंमत काही मिनिटाच्या आत 82 हजार रुपये झालेली असेल.

 विक्री आता विक्री करायला जाल तर 82 हजार रुपये तर किंमत घटून झालेलीच आहे पण त्यात सोन्याची घट देखील धरणार जी कॉलिटी वर आधारित असते मग ते म्हणतील की याच्यामध्ये केडियम किंवा तांब कॉपर इत्यादी गोष्टी टाकलेल्या आहेत अगदी वेगवेगळ्या गोष्टी सांगून ते त्याची किंमत कमी करतील आणि लास्ट ला तुम्हाला सांगतील की वजनानुसार याचे तुम्हाला 60 हजार रुपये मिळतील.

अगदी एक वर्षांनी आल्यानंतर सोन्याचा रेट दहा हजार वीस हजारांनी वाढलेलं जरी असला तरी देखील वाढलेला रेटमध्ये देखील तुम्हाला 30 ते 40 टक्के घटीवर ते सोनं विकावं लागेल.

 त्यामुळेच गुंतवणूक म्हणून कधीही दागिने हा पर्याय कधी निवडू नका जर एखादी गोष्ट तुम्हाला बनवायचे असेल तर तिला गुंतवणूक म्हणून न पाहता तिला एक गरज म्हणून बनवून घ्या. 

किंवा तुमचा असा विचार असेल की आता थोडेफार पैसे आहेत आणि भविष्यात जर काही गरज पडली तर याच्यामधून आपली गरज भागवू शकेल आपल्या अडचण दूर होऊ शकेल तर या दृष्टीने केव्हाही सोन्याची दागिने बनवून ही गुंतवणूक अगदी नुकसानकारक ठरू शकते .

मग आता गुंतवणूक म्हणून सोन्यात खरेदी करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही सोन्याचे बिस्किट्स जे 24 कॅरेट्स म्हणजेच 99.99% शुद्ध असतात हे घेऊ शकता ज्यामध्ये मेकिंग चार्ज म्हणजेच मजुरी नसते.व त्याबरोबर विक्री करत असताना कुठल्याही क्वालिटी म्हणजेच घट वगैरे याच्यामध्ये धरली जात नाही म्हणजेच विक्री करतानी मात्र 3% इतका जीएसटीच त्याच्या मध्ये आकारला जात असतो.

Sovereign Gold Bond:-

भारत सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केले आहे

1 ग्रॅमच्या मूळ युनिटसह सोन्याच्या ग्रॅम(चे) गुणाकारांमध्ये निरूपित केलेले रोखे

बॉण्डचा कालावधी 8 वर्षांच्या कालावधीसाठी आहे आणि 5 व्या वर्षानंतर एक्झिट पर्यायाचा वापर व्याज देय तारखेला केला जाईल

किमान गुंतवणूक 1 ग्रॅम सोन्याची असेल

जास्तीत जास्त सदस्यत्व मर्यादा व्यक्तींसाठी 4 KG तसेच HUF आणि ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्थांसाठी 20 KG आहे

सुरुवातीच्या गुंतवणुकीच्या रकमेवर स्थिर व्याज दर @ 2.5%

महिन्याला ५०००० मिळण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल ?

Sovereign Gold Bond कुठून खरेदी करावे :-

Sovereign gold bond खरेदी करण्यासाठी तुम्ही कोणत्याही बँकेच्या वेबसाईटवर जाऊन खरेदी करू शकता आता आम्ही इथे खाली स्टेट बँक ऑफ इंडिया आयसीआयसीआय बँक एचडीएफसी बँक यांच्या सुविधा खरेदी करण्याच्या लिंक दिलेली आहे नक्कीच तुम्ही त्यावर क्लिक करून माहिती घेऊ शकता

State Bank of India

https://sbi.co.in/web/personal-banking/investments-deposits/govt-schemes/gold-banking/sovereign-gold-bond-scheme-sgb

ICICI Bank

https://www.icicibank.com/personal-banking/investments/sovereign-gold-bond

HDFC Bank

https://www.hdfcbank.com/personal/invest/bonds-and-securities/sovereign-gold-bonds

Leave a Comment