आज आपण ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक लाभ देणारे असे चार फायदे जाणून घेणार आहोत ज्यांचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वयाच्या साठ वर्षानंतर घेता येणार आहे आणि त्यांना त्यांचे पुढील आयुष्य जगण्यासाठी कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचणही येणार नाही. मी तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांसाठी चार फायदे सांगणार आहे या चार फायद्यांचा निश्चितचपणे तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे चला तर पाहूयात असे कोणते चार फायदे की ज्यांचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वयाच्या 60 वर्षानंतर घेता येणार आहे आणि त्यामुळे त्यांची आर्थिक अडचण सुद्धा दूर होणार आहे .
1.इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना:-
शासकीय निवृत्तीवेतन योजनांनी ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक अडचणींपासून नेहमी दूर केलेला आहे.इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती वेतन योजना ही एक विशिष्ट प्रकारची पेन्शन योजना आहे.ही योजना 2007 मध्ये भारतीय ग्रामीण विकास मंत्रालयाने सुरु केली आहे. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक पेन्शन, विधवा पेन्शन, आणि अपंगांना पेन्शन देऊन लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ठ आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचं वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असणार आवश्यक आहे.या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एक रक्कम दर महिन्याला नियमितपणे पेन्शन म्हणून देण्यात येत असते पूर्वी दर महिन्याला 600 रुपये इतकी पेन्शन दिली जायचे. हे मिळवण्यासाठी तुम्हाला 1 रुपयाही भरण्याची गरज नाहीये.योजना पूर्णतः सरकारच्या अनुदानावर राबवली जाते. ज्येष्ठ नागरिकांबरोबरच या योजनेमध्ये विधवा महिला अपंग व्यक्ती हेही लाभ घेऊ शकतात.
पात्रता- दारिद्रय रेषेखालील 65 व 65 वर्षावरील सर्व व्यक्ती पात्र होतील. या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रु.200/- प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून गट (अ) रु.400/- प्रतिमहा निवृत्तीवेतन मिळते. यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून रुपये 400/-प्रतिमहा व केंद्र शासनाकडून रुपये 200/- प्रतिमहा असे एकूण रुपये 600/-प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन मिळते.
2.ज्येष्ठ नागरिक कार्ड (Senior Citizen Card) :-
जेष्ठ नागरिक कार्ड / सिनियर सिटीझन कार्ड / प्रमाणपत्र म्हणजे काय तर थोडक्यात सांगायचे झाले तर ज्येष्ठ नागरिकांना सरकारी विभाग, सार्वजनिक कंपनी, खाजगी किंवा व्यवस्थापना मार्फत दिल्या जाणाऱ्या सवलती, सेवा तसेच प्राधान्य सेवांमध्ये एडमिशन, प्रवेश सुलभ व सोपा करण्यासाठी वयाचा पुरावा म्हणून जेष्ठ नागरिक कार्ड / सिनियर सिटीझन कार्ड वापरता येते, तसेच एस टी मध्ये प्रवास करतांना प्रवास भाड्यात सवलत घेण्यासाठी हे कार्ड आवश्यक आहे. हे कार्ड असेल तर हॉस्पिटल मध्ये कमीत कमी 60 वर्षे वय असणारे व्यक्तींना 30% सवलत असते. अजून ही बराच लाभ जेष्ठ नागरिक कार्ड वर मिळतो. हे कार्ड ऑनलाईन काढता येते
3.प्रधानमंत्री वय वंदना योजना :- (Prime Minister Vaya Vandana Yojana)
प्रधानमंत्री वय वंदना योजनेचा लाभ 60 वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाची व्यक्ती घेऊ शकते. ही योजना 10 वर्षाची आहे. प्रधानमंत्री वय वंदना योजनेंतर्गत 1 महिना, 3 महिने, 6 महिने आणि वार्षिक पेन्शन सुविधा उपलब्ध आहे. यापैकी कोणत्या सुविधेचा लाभ घ्यायचा हे गुंतवणूकदार स्वतः निवडू शकतो. या योजनेंतर्गत गुंतवणूकदाराला वार्षिक 8 टक्के दराने व्याज मिळते. या योजनेत 1000 रु. ते 15 लाख पर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. आणि त्यातून परतावा सुद्धा गुंतवणुकीच्या हिशोबानेच मिळत असतो.60 वर्षानंतर फायदेशीर
4.जेष्ठ नागरिक वचत योजना :- (Senior Citizen Saving scheme)
जेष्ठ नागरिक बचत योजना ही योजना 60 वर्षे वय असलेल्या व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी अतिशय चांगल्या प्रकारची बचत योजना आहे, या योजनेत निवृत्तीनंतर चाग्ल्याप्रकारे उत्पन्नाचे साधन म्हणून जेष्ठ नागरिक गुंतवणूक करू शकतात, ही योजना भारत सरकार कडून चालवली जाते, म्हणून ही एक सुरक्षित अशी बचत योजना आहे. या योजनेचा व्याजदर इतर योजनांपेक्षा जास्त आहे, परतावा सुद्धा जास्त मिळतो. या योजनेत कमीत कमी 1000 रु. पर्यंत गुंतवणूक जेष्ठ नागरिकांना करता येऊ शकते, व जास्तीत जास्त 30 लाखपर्यत गुंतणूक या योजेत करता येऊ शकते. या योजनेची मुदत 5 वर्षाची आहे. या योजनेत 8.2% व्याज ठेवीच्या रक्कमेवर दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही बँकेत किंवा पोस्टात खाते उघडू शकता.
महिन्याला 50000 रुपये देणारी सरकारी योजना कोणती ?
5.ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन
Elder line ही ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन आहे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स च्या सहकार्याने स्थापन केली आहे.
एल्डर लाइन 14567 हा एक टोल-फ्री क्रमांक आहे जो सकाळी 8:00 ते रात्री 8:00 पर्यंत कार्यरत असतो, जो सातत्यपूर्ण मूल्यांद्वारे चालविलेल्या बेघर वृद्धांना मोफत माहिती, मार्गदर्शन, भावनिक समर्थन, शोषणाच्या प्रकरणांमध्ये क्षेत्रीय हस्तक्षेप, सुटका आणि पुनर्मिलन प्रदान करतो. काळजी, सहानुभूती आणि प्रोत्साहन.
कायदेशीर सल्ला,
तणाव निवारण,
आरोग्य संबंधी सल्ला,